औरंगाबाद पोलिसांनी आजच्या सकल जन गर्जना मोर्च्याला परवानगी नाकारली!

Aurangabad Police Denied Permission for Sunday's Sakel Jan Garjana Morcha!
Aurangabad Police Denied Permission for Sunday's Sakel Jan Garjana Morcha!

औरंगाबाद: औरंगाबादेत रविवारी 19 मार्च क्रांतीचौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जन गर्जना मोर्च्याचे आय़ोजन करण्यात आले होते. लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासह छत्रपती संभाजीनगर समर्थनात हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते यांनी मोर्च्या, सभेला परवानगी नाकारली आहे. Aurangabad Police Denied Permission for Sunday’s Sakel Jan Garjana Morcha!

शहरात औरंगाबाद नामांतरावरून काही दिवसापासून समर्थनार्थ तर विरोधात अशा प्रकारचे आंदोलन होत आहे. सकल हिंदू समाज या बॅनरखाली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसच्या मंडळींकडून मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

 मोर्चा,सभेचे असे होते नियोजन…  

क्रांतीचौक येथून पैठणगेट टिळकपथ मार्गे महात्मा ज्योतीबा फुले चौकात मोर्च्याचे सभेमध्ये रुपांतर होणार होते. परंतु पोलिसांनी कायदा सुव्यस्थेच्या प्रश्नावरून परवानगी नाकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here