रिक्षाचालकाने तरुणीला विचारले सेक्स करायला आवडेल का.., राज्य महिला आयोगाने घेतली दखल!

aurangabad-rickshaw-driver-tries-to-molest-girl-in-running-rickshaw-news-update-today
aurangabad-rickshaw-driver-tries-to-molest-girl-in-running-rickshaw-news-update-today

औरंगाबाद : औरंगाबादेत रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात तरुणीशी अश्लिल भाषेत संभाषण करत छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीच्या या प्रसंगामुळे तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे आरोपीचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. 

 नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील सिल्लेखाना परिसरात एका तरुणीसोबत रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तरुणी रिक्षात एकटी असल्याचे पाहून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करायला सुरुवात केली होती. याच कारणामुळे तरुणीने घाबरून धावत्या रिक्षातून उडी घेतली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. तर या घटनेची दखल घेत औरंगाबाद पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद याला अटक केली आहे.

 पोलीसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीला बेड्या ठोकल्या

या घटनेबाबतची सविस्तर माहिती येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालकाच्या अश्लिल संभाषणामुळे तरुणीने सिल्लेखाना चौक परिसरात रिक्षातून उडी घेतली. यामुळे तरुणीच्या डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली आहे. या तरुणीला रिक्षाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सय्यदला अटक केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.

 अशी उघडकीस आली घटना

एमजीएम रुग्णालयात़न रविवारी दुपारी घडलेल्या घटनेची एमएलसी क्रांतीचौक पोलिसांना सोमवारी मिळाली. त्यानुसार एक कर्मचारी मुलीच्या जबाबासाठी रुग्णालयातून गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याने निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना माहिती दिली. डॉ.दराडे यांनी रुग्णालयात धाव घेतली.  विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके यांना रिक्षासह चालकाचा शोध घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी 40 ठिकाणाचे फुटेज तपासले. 10 रिक्षांची तपासणी केली. यासाठी डॉ. दराडे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक महादेव गायकवाड यांनीही मदत केली. 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here