रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं ‘लव्ह’, औरंगाबादेत थाटात लग्न

aurangabad-sanchi-ragade-marriage-england-london-edward-news-update-today
aurangabad-sanchi-ragade-marriage-england-london-edward-news-update-today

औरंगाबाद : औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात एडवर्ड पडला. २०१९ पासून इंग्लंडमध्ये दोघे सोबत होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले. दोघांनीही घरच्यांना सांगितले. विशेष म्हणजे दोघांच्या कुटुंबाने ते मान्य करीत लग्नाला होकार दिला. यानंतर भारतीय पद्धतीने औरंगाबादमध्ये लग्न करण्याचं ठरले.

इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीनं हा विवाह सोहळा गुरुवारी औरंगाबादेत पार पडला. या आगळ्या वेगळ्या लग्नाची शहरात जोरदार चर्चा आहे.

एडवर्ड आणि रगडे कुटुंबीयाने एकत्र येत शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न पार पाडलं. भारतीय बौद्ध पद्धतीने दोघांचं लग्न झालं. वरात देखील निघाली आणि वरातीत एडवर्डच्या संपूर्ण कुटुंबाने भारतीय गाण्यावर ठेका धरला होता.

ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एका तासाचे काम असते मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचा सोहळा आहे. हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिलीय. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न असल्याने आनंद होत असल्याचं सांगितलं.

जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद असल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलंय. सांची आता कायमची सातासमुद्राच्या पार राहायला जाणार याचं दुःख आहे. मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली. या लग्नाची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here