Auto Expo 2023: ८० पैसे प्रति किमी खर्च, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार

नोएडा येथे सुरु असलेल्या १६ व्या Auto Expo 2023 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक अशा सरस कार्स पाहायला मिळाल्या आहेत. १८ जानेवारीपर्यंत हा शो सुरु राहणार असल्यामुळे आणखी काही कार पाहायला मिळणार आहेत.

auto-expo-2023-vayve-mobility-unveils-indias-first-solar-powered-electric-car-eva-kvg-85-news-update-today
auto-expo-2023-vayve-mobility-unveils-indias-first-solar-powered-electric-car-eva-kvg-85-news-update-today

Vayve EVA Solar Powered Electric Car: नोएडा येथे सुरु असलेल्या १६ व्या Auto Expo 2023 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक अशा सरस कार्स पाहायला मिळाल्या आहेत. १८ जानेवारीपर्यंत हा शो सुरु राहणार असल्यामुळे आणखी काही कार पाहायला मिळणार आहेत. भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता अनेक नवीन वाहन उत्पादक कंपन्या आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहेत.

पुण्यातील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप Vayve Mobility ने ग्रेटर नोएडा येथील Auto Expo 2023 मध्ये सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार Vayve EVA सादर केली आहे. या स्टार्ट-अपचा दावा आहे की, ही देशातली सर्वात पहिली सोलार पॉवर म्हणजेच सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिक कार आहे. शहरात रोज वापरता येईल अशी शक्यता ध्यानात घेऊन ही कार बनविण्यात आली आहे. शहरात नियमित प्रवासासाठी ही कार अतिशय उपयुक्त ठरु शकते.

Vayve Mobility च्या प्रोग्राम मॅनेजर अंकिता जैन यांनी सांगितले की, हे एक प्रोटोटाइप मॉडेल आहे. शहरातील दैनंदिन वापराची गरज लक्षात घेऊन कारची डिझाईन केली गेली आहे. या कारमध्ये दोन प्रौढ आणि एक लहान मुल आरामात बसू शकते. लहान आणि आकर्षक असा लूक या कारला दिलेला आहे. या इलेक्ट्रिक कारला दोन दरवाजे देण्यात आले आहेत. तसं पाहायला गेलं तर ही कार थोडीबहुत महिंद्राच्या E20 सारखी दिसते.

Vayve EVA मध्ये पुढच्या बाजूला एक छोटी सिंगल सीट दिली आहे, जिथे चालक बसू शकतो. तर मागच्या बाजूला थोडी मोठी जागा दिली आहे. ज्याठिकाणी एक प्रौढ आणि एक लहान मुल आरामात बसू शकेल. चालकाच्या बाजूला दरवाजाजवळ एक फोल्डिंग ट्रे दिला गेला आहे. ज्यावर तुम्ही लॅपटॉप किंवा इतर वस्तू ठेवू शकता. चालक सीट ६ वे ॲडजेस्टबल स्वरुपात आहे. याच्यासोबतच कारला पॅनरोमिक सनरुफही दिलेला आहे. एसी, अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हीटी सिस्टिम देखील दिली आहे.

Vayve EVA ची साइज

सौरऊर्जा आणि इतर फिचर तर भारी आहेच. कारच्या साइजबाबत बोलायचे झाल्यास, याची लांबी ३०६० एमएम, रुंदी ११५० एमएम, उंची १५९० एमएम आणि १७० एमएमचे ग्राऊंड क्लिअरंस दिले गेले आहे. कारच्या पुढच्या बाजूला स्वतंत्र कोल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशन दिला गेला आहे. पुढच्या चाकांना डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांना ड्रम ब्रेक्स दिले गेले आहेत. इलेक्ट्रिक स्टीअरिंग असेलेल्या या कारमध्ये टर्निंग रेडियस ३.९ मीटर एवढे आहे. या कारचा टॉप स्पीड ७० किमी प्रतितास एवढा आहे. शहरातील सीटी राईडसाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते. कारची साइज जरी लहान असली तरी आत बसल्यानंतर ती फार छोटी नसल्याचा फिल येतो.

बॅटरीची क्षमता

ही एक प्लगइन इलेक्ट्रिक कार आहे. यामध्ये १४kwh क्षमतेची (Li-iOn) बॅटरी दिली आहे. यामध्ये लिक्विड कूल्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर झाला आहे. जो १२ kw ची पॉवर आणि 40Nm टॉर्क उत्पन्न करतो. सिंगल स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असलेल्या या कारमध्ये रिजनरेटिंग ब्रेकिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. जो बॅटरीच्या पॉवरला आणखी वाढवतो.

खर्च किती येईल

कंपनीने दावा केला आहे की, एका सिंगल चार्जमध्ये ही गाडी २५० किमी पर्यंत प्रवास करु शकेल. यामध्ये सोलर पॅनेल दिले गेले आहे. ज्याचा सनरुफच्या जागी वापर केला जाऊ शकतो. अंकिता जैन यांनी सांगितले की, ही कार पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार नाही. यामध्ये दिलेला सोलर पॅनल एक पर्याय म्हणून काम करेल. जो बॅटरीच्या चार्जिंगशिवाय अतिरिक्त १० किमीची ड्राइविंग रेंज प्रदान करेल. मात्र या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर रनिंग कॉस्ट केवळ ८० पैसे प्रति किलोमीटर एवढी पडते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here