सलमान खानच्या बहिणीच्या सासऱ्यांनी मिळवला हिमाचल विधानसभेत विजय!

ayush-sharma-father-anil-sharma-won-himachal-election-result-2022-news-update-today
ayush-sharma-father-anil-sharma-won-himachal-election-result-2022-news-update-today

मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा मुलगा आणि भाजपचे उमेदवार अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी मोठा विजय मिळवला आहे. हा विजय मिळवल्यानं अनिल यांनी त्यांचा गड राखला. अनिल शर्मा यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनिल शर्मा यांचा मुलगा आणि अभिनेता आयुष शर्मा (Ayush Sharma) यानंदेखील वडिलांना शुभेच्छा दिल्या.

हिमाचल प्रदेश विधानसभेचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत भारती जनता पार्टीतर्फे अनिल शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चंपा ठाकूर यांचा सुमारे १० हजार ६ मतांनी पराभव केला. आयुषनं वडिलांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्याचं अभिनंदन करणारी पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

आयुषनं वडिलांचा विजय झाल्यानंतर तिथं होत असलेल्या जल्लोषाचा फोटो शेअर केला. फोटो शेअर करत त्यानं लिहिलं की, ‘वारसा पुढे सुरूच आहे… बाबा तुमचं खूप खूप अभिनंदन. आमच्या कुटुंबावर विश्वास कायम ठेवलात त्याबद्दल मंडीमधील सर्व मतदारांचे आभार.’

हेही वाचा: हिमाचल में कांग्रेस को बहुमत: काँग्रेस ने 40 सीटें जीती, भाजपा 25 पर सिमटी; 5 मंत्री भी हारे

आयुषनं सलीम खान यांची मुलगी आणि सलमान खान ची बहिण अर्पिता खानशी २०१४ मध्ये लग्न केलं. अर्पिता आणि आयुषला आयत आणि आहिल अशी दोन मुलं आहेत. आयुषचे वडील सलीम खान यांचे व्याही आहेत. आयुषचा लवकरच तो ASO4 या सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा: हिमाचल प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत:40 जागांवर विजय, भाजपाची सत्ता गेली, 25 जागा मिळाल्या; 10 पैकी 8 मंत्र्यांचाही पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here