“मंत्रीमंडळ विस्तार होणारच नसेल, तर…”, बच्चू कडूंचा शिंदे सरकारला घरचा आहेर; म्हणाले…

बच्चू कडू म्हणाले माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही.

bachchu-kadu-mocks-eknath-shinde-government-on-cabinet-expansion-news-updat-today
bachchu-kadu-mocks-eknath-shinde-government-on-cabinet-expansion-news-updat-today

मुंबई: राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यामध्ये चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे राज्य मंत्रीमंडळ विस्तार. आधी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळाने कारभार पाहिल्यानंतर आत्तापर्यंत फक्त एकच मंत्रीमंडळ विस्तार झालेला आहे. अजूनही २३ मंत्रीपदं रिक्त असून सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळाचा विस्तार प्रलंबित आहे. त्यासंदर्भात सातत्याने पुढची तारीख मिळत असताना आता सरकारमधील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

२१-२२ तारखेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार – संजय शिरसाट 

प्रहार संघटनेच बच्चू कडू यांनी यांदर्भात टीव्ही ९ शी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत केलेल्या एका विधानासंदर्भात विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावरून शिंदे सरकारला खोचक सल्ला दिला आहे. “मंत्रीमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी असून येत्या १५ तारखेपर्यंत या अडचणी दूर होतील आणि २१-२२ तारखेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल. सगळ्याच आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिरसाट यांनी कुठून बातमी आणली मला माहिती नाही. पण आता आम्हालाही असं वाटतंय की एक तर तुम्ही विस्तार करूच नक, थेट सांगून टाका की विस्तार होणार नाही. सगळे शांततेनं सरकारसोबत राहतील. पण ते फूल काढायचं, खिशात ठेवायचं, पुन्हा काढायचं असं करू नका. काय तांत्रिक बाबी असतील, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ते सांगून टाकायला हवं की अमुक तांत्रिक अडचणींमुळे विस्तार होऊ शकत नाहीये. सगळे ५०-६० आमदार कुणीही काही बोलणार नाही”, असं कडू म्हणाले.

“सगळ्या आमदारांमध्ये कुजबूज सुरू”

“जर विस्तार नसेल होत तर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. आणि जर विस्तार होत असेल, तर तो सरळ सरळ लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे”, असं बच्चू कडू म्हणाले

“माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही.

“तांत्रिक अडचणीबद्दल नाराजी नाही, पण…”

फडणवीस म्हणत होते अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार करू. नंतर अधिवेशन झालं. त्यात तांत्रिक अडचण असू शकते. आमची काय त्याबद्दल नाराजी नाही. पण माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे सांगून टाकायला हवं. प्रमुख लोकांनी हे स्पष्टपणे सांगायला हवं. त्याबाबतचा जनतेमधला संभ्रम दूर करायला हवा”, असंही बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here