अर्णब गोस्वामींसह दोन आरोपींना अखेर जामीन मंजूर

आठ दिवसानंतर तुरुंगातून येणार बाहेर

anvay-naik-arnab-goswami-case-bombay-high-court-new-petition
anvay-naik-arnab-goswami-case-bombay-high-court-new-petition

नवी दिल्ली l अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब Arnab Goswami गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

हेही वाचा l 10 लाख शिक्षकांना करावी लागणार स्वखर्चाने कोरोना चाचणी

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी Arnab Goswami  यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here