Bank Holidays October 2020 : ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस

बँका केव्हा-केव्हा राहणार बंद, बँकांचे व्यवहार उरकून घ्या

banks-long-holidays-in-october-2020-know-when-the-banks-will-remain-closed
Bank Holidays October 2020 : ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस banks-long-holidays-in-october-2020-know-when-the-banks-will-remain-closed

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात गांधी जयंती, दसरा, दिवाळी, भाऊबीज यासारखे मोठे सण आहेत. या महिन्यात महत्त्वाचे सणवार असल्याने 13 दिवस बँका बंद राहणार असून महिन्याभरात केवळ 17 दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. (Bank Holidays in October 2020)

बँकांसंबंधी काही महत्त्वाची कामे असतील तर ती लवकरात लवकर करून घेणे ग्राहकांना हिताचे ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात नेहमीच्या तुलनेत अधिक सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज 13 दिवस होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नमूद केले आहे की, ऑक्टोबर २०२० (October 2020) मध्ये बँकिंगचे काम काही दिवस बंद राहणार आहे. जर आपल्याला या सुट्ट्यांबद्दल (Bank Holiday) माहिती असेल तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचे बँका व्यवहाराची योजना बनवू शकतात.

पुढचा महिना हा सणासुदीचा आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक घराबाहेर फिरण्याचे टाळत आहेत. अत्यावश्य असेल तरच घराबाहेर पडताहेत. आता अनलॉक-05 ला सुरुवात होणार आहे. काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे. दुकाने, शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉल आणि पर्यटन स्थळे उघडत आहेत. परंतु काही खरेदी करायचा बेत असेल तर बँकांचे व्यवहार लवकर करुन घेणे हिताचे ठरणार आहे.

बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या असतात आणि सर्व बँकिंग कंपन्या ते विचारात घेत नाहीत. बँकिंगच्या सुट्या विशिष्ट राज्यांमध्ये साजरे करण्यात येणाऱ्या सणांवर किंवा त्या राज्यातील विशिष्ट प्रसंगांच्या अधिसूचनेवर अवलंबून असतात. आता पुढील महिन्यात नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दसरा असणार आहे. त्यामुळे हे सगळे सण लक्षात घेता अनेक राज्यांमध्ये बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. म्हणून सुट्ट्या पाहूनच आपल्या बँकेची कामं करा.

ऑक्टोबर 2020,  बँक हॉलिडे (Bank Holiday list)

तारीख आणि दिवस      सुट्टी

२ ऑक्टोबर, शुक्रवार      महात्मा गांधी जयंती

४ ऑक्टोबर, रविवार      वीक ऑफ

८ ऑक्टोबर, गुरुवार      चेल्लुम, रिजनल हॉलिडे

१० ऑक्टोबर, शनिवार    दुसरा रविवार

११ ऑक्टोबर, रविवार     वीक ऑफ

१७ ऑक्टोबर, शनिवार    आसाममध्ये कटि बिहू

१८ ऑक्टोबर, रविवार     वीक ऑफ

२३ ऑक्टोबर, शुक्रवार     महासप्तमी, रिजनल हॉलिडे

२४ ऑक्टोबर, शनिवार    महाअष्टमी, रिजनल हॉलिडे

२५ ऑक्टोबर, रविवार     वीक ऑफ, विजयादशमी (दसरा)

२९ ऑक्टोबर, गुरुवार,     मिलाद-ए-शरीफ, रिजनल हॉलिडे

३० ऑक्टोबर, शुक्रवार     ईद-ए-मिलाद

३१ ऑक्टोबर, शनिवार    महर्षि वाल्मीकि, सरदार पटेल जयंती, रिजनल हॉलिडे

सुट्टीच्या कालावधीनुसार आपल्या बँकेच्या व्यवहारासंबंधी योजना आखल्या पाहिजेत. राजपत्रित सुटीच्या दिवशी देशभरात बँका बंद असल्या तरी विविध राज्यांनी घोषित केलेल्या सुट्यांनुसार प्रादेशिक सुट्टी साजरी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here