सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला!

नाशिकमधील अंजनेरी भागात ट्रेकसाठी गेले असता मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.

bee-attack-on-ias-manisha-mhaiskar-milind-mhasikar-facebook-post-nashik-morning-walk-news-update
bee-attack-on-ias-manisha-mhaiskar-milind-mhasikar-facebook-post-nashik-morning-walk-news-update

मुंबई: सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर (Milind Mhasikar) आणि मनिषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. नाशिकमधील अंजनेरी भागात ट्रेकसाठी गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मनिषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मिलिंद म्हैसकर सर्वात पुढे असल्याने त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला जास्त झाला. दरम्यान त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे. मनिषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अंजनेरी भागात मॉर्निग वॉकसाठी गेले असता मिलिंद सर्वात पुढे चालत होते. काही वेळाने मिलिंद यांनी मागे वळून मला तिथून धाव घेण्यास सांगितलं. मधमाशांनी हल्ला केला आहे हे समजण्यास मला थोडा वेळ लागला. मी माझ्याकडची स्टोल त्यांच्याकडे फेकली. पण मधमाशांच्या हल्ल्यात त्याची फारशी मदत झाली नाही”.

मिलिंद म्हैसकर मधमाशांपासून सुटका घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तिथे उपस्थित काहीजणांनी प्रसंगावधान दाखवत मनिषा म्हैसकर यांच्या दिशेने शॉल आणि कोट फेकले. यामुळे त्यांचा बऱ्यापैकी बचाव झाला. यानंतर एका व्यक्तीने आग आणि धुराच्या सहाय्याने मधमाशांपासून सुटका करुन घेण्यात मदत केली.

संबंधित व्यक्तीला मधमाशांच्या हल्ल्याबद्दल माहिती असल्याने त्यांनी मिलिंद यांना प्रथमोपचारासाठी मदत केली. दरम्यान म्हैसकर दांपत्य या हल्ल्यातून बचावलं असून मिलिंद यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे.

हेही वाचा 

पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे; ओवेसींचा मोदींवर निशाणा! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here