सिमला मिरची खाण्याचे फायदे

Benefits of eating Simla Chili
Benefits of eating Simla Chili

आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकजण काळजी घेत असतो. काही मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार आहार घेत असतात. शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस आणि पौष्टिक आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याच वेळा आपण पालेभाज्या किंवा भोपळी मिरची, कारले अशा भाज्या खाणं टाळतो. परंतु, नावडतीच्या असणाऱ्या याच भाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

भोपळी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत. भोपळी मिरचीला अनेक जणसिमला मिरची किंवा ढोबळी मिरची असंदेखील म्हणतात. भोपळी मिरची खाण्याचे फायदे कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

मधुमेह राहतो नियंत्रणात


वजनाप्रमाणेच भोपळी मिरचीमध्ये शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसंच तिच्यात व्हिटामिन्स आणि अॅटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं.

वजन नियंत्रणात राहते

या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे भोपळी मिरचीची भाजी खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. तसंच ती शरीरातील मेददेखील कमी करण्यास मदत करते. वजन कमी करायचं असल्यास भोपळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचं आहे. या भाजीतून शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे वारंवार होणारे लहान-मोठे आजार दूर राहतात.

अपचनक्रिया सुधारते

अनेक जणांना अपचन झाल्यावर त्रास होतो. मात्र भोपळी मिरची खाल्लास पचनक्रिया सुरळीत राहते. तसंच पोटाचे विकारदेखील बरे होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here