परत चुकल्यास क्षमेची अपेक्षा करू नका; भाई जगताप यांचा कंगनाला इशारा

bhai-jagtap-congress-mla-criticised-kangana-ranaut-shivsena-bmc
bhai-jagtap-congress-mla-criticised-kangana-ranaut-shivsena-bmc

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी कडवट टीका अभिनेत्री कंगना रनौतने केली होती. कंगनाला काँग्रेस नेते विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी इशारा दिला आहे.

कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेनं काल (९ सप्टेंबर) पाडला. यावरून संतापलेल्या कंगनानं ट्विटरवरून शिवसेना, काँग्रेसवर निशाना साधला. कंगनाच्या या ट्विटला काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी कंगनाला इशारा दिला आहे. कंगना आणि काँग्रेस असा वाद निर्माण झाला आहे.

भाई जगताप कंगनाला म्हणाले

“आपण एकदा चुकल्यास, आम्ही आपल्याला चेतावणी देऊ. आपण पुन्हा चुकल्यास, आम्ही आपले मार्गदर्शन करू. आपण परत परत चुकल्यास, क्षमेची अपेक्षा करू नका. जय हिंद… जय महाराष्ट्र,” अशा शब्दात भाई जगताप यांनी कंगनाला समज दिली.

कंगनाच्या या ट्विटमुळे भाई जगताप संतापले

“श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्वीट कंगनाने केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरुन कंगनाने निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here