Bharat bandh l”अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है,” आंदोलक संतप्त

bharat-bangh-called-for-by-farmers-protesting-the-farm-laws-narendra-modi-pune
bharat-bangh-called-for-by-farmers-protesting-the-farm-laws-narendra-modi-pune

पुणे : कृषी कायद्यांविरोधात आज भारत बंद आहे. शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. पुण्यात अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात ठिय्या आंदोलन protest सुरू करण्यात आले. यावेळी आंदोलक संतप्त झाले होते. “अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है” Narendra modi अशा घोषणा देण्यात आल्या.

दिल्ली येथील आंदोलनास समर्थन दर्शविण्यासाठी पुण्यातील अलका चौकात महाविकास आघाडीसह अन्य पक्ष, संघटना यांच्याकडून ठिय्या आंदोलन सुरु आहे.

कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

हेही वाचा : Bharat bandh l ‘७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा’

भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दर्शवलेला असून केंद्र सरकारने यावरुन टीका केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे.

दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here