मुंबई : काँग्रेस नेते खा. राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राज्यातले अनेक प्रमुख नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी रात्री आपल्याला फोन करून तब्येतीची विचारपूस केली असल्याचं खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं आहे.
भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन
माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा
ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीचं ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..