Rashi-Bhavishya l आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर l जाणून घ्या तुमचे शुक्रवारचे भविष्य

daily-rashi-bhavishya/daily-horoscope-26-october-2021-today-rashi-bhavishya-update
daily-rashi-bhavishya/daily-horoscope-26-october-2021-today-rashi-bhavishya-update

आजचे राशीभविष्य 30 October 2020 l कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?Rashifal-Rashi-Bhavishya 

  • मेष राश भविष्य l Aries Horoscope Today l भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.
  • वृषभ राश भविष्य l Tauras Horoscope Today l बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. आजचा शुभ रंग – निळा.
  • मिथुन राश भविष्य l Gemini Horoscope Today l आज तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा लवकरच योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल. आजचा शुभ रंग – हिरवा
  • कर्क राश भविष्य l Cancer Horoscope Today lव्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. आजचा शुभ रंग – पिवळा.
  • सिंह राश भविष्य l Leo Horoscope Today l आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – पांढरा
  • कन्या राश भविष्य l Virgo Horoscope Today l बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आज मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.
  • तूळ राश भविष्य l Libra Horoscope Today l  मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग पांढरा
  • वृश्चिक राश भविष्य l Scorpio Horoscope Today l वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. आजचा शुभ रंग – लाल
  • धनु राश भविष्य l Sagittarius Horoscope Today l  नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग दुपारनंतर निर्माण होईल. आजचा शुभ रंग – पांढरा. 
  • मकर राश भविष्य l Capricorn Horoscope Today l आज धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – केशरी.
  • कुंभ राश भविष्य l Aquarius Horoscope Today l आज वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – निळा. 
  • मीन राश भविष्य l Pisces Horoscope Today l आज शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – पिवळा

   हेही वाचा l  Bihar Munger l“बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here