BIGG BOSS 14 : ‘या’ भोजपुरी स्टारला मिळाली शोची ऑफर!

bhojpuri-star-amrapali-dubey-get-offered-of-bigg-boss-14
bhojpuri-star-amrapali-dubey-get-offered-of-bigg-boss-14

बिग बॉस 14 हा छोट्या पड्द्यावरील शो लवकरच येणार आहे. सर्वांनाच उत्सूकता लागली, शोमध्ये कोणते कलकार येतील याची. भोजपुरी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील लोकप्रिय शोमधील अभिनेत्री आम्रपाली दुबेला बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोची ऑफर दिली आहे. आम्रपाली सलमानची मोठी चाहती आहे. त्यामुळे निश्चित ती कार्यक्रमात दिसणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

बिग बॉसमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात अनेक भोजपुरी कलाकारांनी हजेरी लावली.  रवि किशन, निरहुआ (दिनेश लाल यादव), मनोज तिवारी, संभावना सेठ, मोनालिसा, दीपक ठाकूर आणि गेल्या पर्वातील खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

स्पॉटबॉयच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस 14 च्या निर्मात्यांनी आम्रपाली दुबेसोबत संपर्क साधला आहे. आम्रपालीची यूपी बिहारमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे, त्याचा चॅनेल आणि या शोला फायदा होऊ शकतो. या शोमध्ये येण्यासाठी तिने होकार दिला की नाही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आम्रपालीने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती सलमानची इतकी मोठी फॅन आहे की तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे.

आम्रपालीच्या करिअर बद्दल

आम्रपालीने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात हिंदी डेली सोपद्वारे केली. ‘रहना हैं तेरी पलकों के छांव में’ ही तिची पहिली मालिका होती. याशिवाय ‘मायका’ आणि ‘सात फेरे’ या मालिकांमध्येही ती झळकली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना तिला भोजपुरी इंडस्ट्रीतून ऑफर आली आणि त्यानंतर तिने आपला मोर्चा तिकडे वळवला. तिने भोजपुरी चित्रपट आणि म्युझिक अल्बममधून 2014 मध्ये करिअरची नवी सुरुवात केली होती.

यंदाच्या 13 सेलिब्रिटी आणि 3 कॉमनर्स बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. कॉमनर्सची डिजिटल ऑडिशनद्वारे निवड केली जाईल. तर घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणा-या बर्‍याच टीव्ही सेलेब्सची नावे यापूर्वी समोर आली आहेत. 4 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here