‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा,आता अक्षय नव्हे कार्तिक करणार धमाल

bhulaiyaa-2-release-date-announced-kartik-aaryan
bhulaiyaa-2-release-date-announced-kartik-aaryan

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘भुलभुलैया-2’ bhulaiyaa-2 19 नोव्हेंबर 2021 प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या भुलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षय कुमार Akshay kumar ऐवजी कार्तिक आर्यन kartik-aaryan मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी kiyara advani मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अभिनेत्री तब्बूची या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. 

कोरोनाचं संकट आणि लॉकडाउनची झळ ही सिनेसृष्टीलादेखील बसली आहे. त्यामुळे 2020 सालात प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक सिनेमांच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. तर अनेक सिनेमाचं चित्रीकरण रखडलं.

वाचा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र; वाचा जसेच्या तसे

यात ‘भुलभुलैया-2’ सिनेमाचाही नंबर लागतो. हा सिनेमा जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रीकरण पूर्ण न झाल्यानं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर या सिनेमाची तारीख जाहीर करण्यात आलीय.

वाचा: महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती

तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या फोटोत कार्तिक आर्यनचा सिनेमामधील लूक दिसून येतोय. भगवी वस्त्र आणि खांद्यावर झोळी घेतलेल्या कार्तिकचा लूक भुलभलैयाच्या पहिल्या भागातील अक्षय कुमारच्या लूक सारखाच दिसून यतोय. तर दुसरा फोटो हा सिनेमाच्या टीमची आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अक्षय कुमारच्या ‘भुलभुलैया’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. या सिनेमातून अक्षयनं प्रेक्षकांच मनोरंजन केलं होतं. त्यामुळे आता कार्तिक आर्यनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय का हे जाणून घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here