वाशिंगटन l अमेरिकेचे America राष्ट्राध्यक्ष जो बायडेन Joe Biden यांच्या उजव्या पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर fractures झालं आहे. बायडेन आपल्या पाळीव कुत्रा shepherd Dog (मेजर) major सोबत खेळत असताना, पाय घसरुन पडले. त्यांच्या उजव्या पायाच्या घोटयाला दुखापत झाली.
बायडेन यांच्याकडे दोन जर्मन शेपर्ड कुत्रे आहेत. त्यातल्या. मेजरसोबत खेळत असताना ७८ वर्षीय बायडेन यांचा पाय घसरुन पडले. एक्सरे मध्ये कुठेही फ्रॅक्चर दिसले नव्हते.
काही तपासण्या केल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ. केविन ओ कॉननॉर यांनी रविवारी सांगितले. सीटी स्कॅनमध्ये छोटेसे हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचे दिसले.
त्यांना काही आठवडे वॉकिंग बूट वापरावा लागणार आहे. असे ओ कॉननॉर यांनी सांगितले. ते जीडब्ल्यू मेडिकल फॅकलटी असोसिएटसमध्ये संचालक आहेत.
याच महिन्यात बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. पुढच्यावर्षी २० जानेवारीला बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
मागच्यावर्षी डिसेंबर २०१९ मध्ये ओ कॉननॉर यांनी बायडेन यांचा हेल्थ रेकॉर्ड जाहीर केला होता. बायडेन पूर्णपणे तंदुरुस्त असून अध्यक्षपदासाठी फिट असल्याचे त्यांनी सांगितले होते.
बायडेन मद्यपान आणि तंबाखूच्या पदार्थाचे सेवन करत नाहीत. आठवडयाचे पाच दिवस ते नियमितपणे व्यायाम करतात.
हेही वाचा l महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल
[…] […]