पक्षश्रेष्ठी ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंच्या पाठिशी; रेणू शर्माच्या अडचणी वाढणार?

renu-sharma-withdraws-rape-case-against-ncp minister-dhananjay-munde
renu-sharma-withdraws-rape-case-against-ncp minister-dhananjay-munde

मुंबई: रेणू शर्मा Renu sharma प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र रेणू विरोधात हनीट्रॅप, ब्लॅकमेलींगच्या चार तक्रारी आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या आरोपांवरील सर्व हवाच निघून गेली. उलट रेणूच्या अडचणीत वाढणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून धनंजय मुंडे Dhananjay munde यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे बैठकीत स्पष्ट झालं आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक,खासदार सुप्रिया सुळे,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

धनंजय मुंडे प्रकरणामुळे ही कोअर कमिटीची ही बैठक महत्त्वाची मानली गेली. रात्री दहा वाजेच्या आसपास या बैठकीला सुरूवात झाली. तर तासभराच्या चर्चेनंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ही बैठक संपली. 

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची माहिती शरद पवार यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून घेतल्याचं सांगण्यात येतंय. विश्वास नांगरे पाटील हे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर संध्याकाळच्या सुमारास दाखल झाले होते. यावेळी शरद पवार यांनी नांगरे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जातंय.

बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

या भेटीत मुंडे यांनी शरद पवारांसमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली. त्यापूर्वी मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर छगन भुजबळांचीही भेट घेतली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरुद्ध चार तक्रारी दाखल झाल्या आहेत.

धनंजय मुंडे, भाजपचे नेते कृष्णा हेडगे, मनसे नेते मनीष धुरी, रिझवान शेख यांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात रेणू शर्माची बाजू कमकुवत पडताना दिसत आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं. 

Grampanchayat l राज्यातील १४ हजार २३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू

Kisan Andolan: किसान बोले- 26 जनवरी को लालकिले से निकलेगी रैली, अमर जवान ज्योति पर फहराएंगे तिरंगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here