मुंबई l बिग बॉस १३ चा विजेता Bigg-boss-13-winner सिद्धार्थ शुक्ला sidharth-shukla कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तो नशेच्या भरात एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.
अलिकडेच सिद्धार्थने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. मात्र, याच काळात सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द खबरी’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये सिध्दार्थने नशेच्या भरात एका डिलिव्हरी बॉयला मारहाण केली आहे. अंधेरीतील ओशिवारा या भागात ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
Yesrerday Birthday Night #SidharthShukla Drank alcohol
was Driving and Beat up Poor citizenLink Here Full Video👇👇https://t.co/NW9ribPpLx pic.twitter.com/iAP4Q5wdTr
— The Khabri (@TheRealKhabri) December 12, 2020
बर्थ डे पार्टी संपल्यावर सिद्धार्थ घरी जाण्यासाठी रवाना झाला. मात्र, त्याच वेळी ओशिवारा या भागात त्याच्या कारला एका डिलिव्हरी बॉयच्या बाईकची धडक बसली.
त्यानंतर डिलीव्हरी बॉय व सिद्धार्थ शुक्ला यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर सिद्धार्थने थेट या मुलावर हात उचलत त्याला मारहाण केली.
दरम्यान, या अपघातानंतर डिलिव्हरी बॉयने सिद्धार्थला चाकू दाखवत मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिद्धार्थने डिलिव्हरी बॉयवर हात उचलल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Fake TRP Scam Case | रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना फेक टीआरपी प्रकरणी अटक