VIDEO : BIGG-BOSS-14 बिग बॉसचं घर यंदा कसं असेल? पाहा व्हिडीओ

आजपासून बिग बॉस रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला

big-boss-14-trophy-today’s-will-be-the-grand-finale-of-bigg-boss-14
big-boss-14-trophy-today’s-will-be-the-grand-finale-of-bigg-boss-14

बिग बॉसचं १४ वं पर्व आज ३ ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बिग बॉस’ लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. पण तितकाच वादग्रस्तही आहे. त्यामुळे प्रेक्षकही दरवर्षी या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. (bigg-boss-14-house-inside-video) बिग बॉसच्या घराची एक झलक. सलमान खान या शोचा होस्ट असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना बिग बॉगसच्या शोची विशेष आवड आहे.

दरम्यान यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’चं घर आतुन कसं असेल? याची एक झलक कलर्स वाहिनीने दाखवली आहे. त्यांनी घराचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे यंदाच्या वर्षी बिग बॉसच्या घरात मॉल, स्पा आणि चित्रपटगृह देखील असेल.

वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. या घरात कोणाला प्रवेश मिळणार? यंदाची थीम काय असणार? याबाबतच्या चर्चांना अनेकदा उधाण येत. त्यातच आता ‘बिग बॉसचं १४ वं पर्व आज ३ ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘बिग बॉस १३’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलंही होतं. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी? याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम सोशल डिस्टंसिंग असावी असा निर्णय घेण्यात आला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस १४’च्या पर्वामध्ये फिजिरल डिस्टंसिंग ही थीम पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 

bigg boss

bigg boss

bigg boss 14

bigg boss

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here