बिहार भाजपा-जेडीयूमध्ये खातेवाटपावरून धुसफूस,आज आमदारांची बैठक

आमदारांची बैठक,दोन्ही पक्षांच्या आमदारांची चिंता वाढली

Bihar BJP-JDU squabbles over account sharing, MLAs meet today
Bihar BJP-JDU squabbles over account sharing, MLAs meet today

पाटणा l बिहारमध्ये ‘एनडीए’ला NDA ला बहुमत मिळाले. मात्र मंत्रीपदाच्या खातेवाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. जेडीयूपेक्षा JDU जास्त जागा भाजपाकडे BJP आहेत, भाजपा मंत्रीपदाच्या जास्त जागांवर ठाम आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्यामुळे एनडीएच्या आमदारांची आज रविवार १५ नोव्हेंबर रोजी  पाटणा येथे बैठक होणार आहे.  

प्रचारादरम्यान सांगितल्याप्रमाणे भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहे. मात्र, संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये जास्तीत जागा भाजपाला हव्या आहेत. याशिवाय, महत्वपूर्ण खात्यांवर देखील भाजपाने दावा केला आहे. जे अगोदर जदयूकडे असायचे. या सर्व वादावर चर्चा करण्यासाठी सुशीलकुमार मोदींनी दिल्ली दरबारी जाऊन परिस्थिती सांगितली.

हेही वाचा l Temples reopen in Maharashtra l सोमवारपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडणार

सुशीलकुमार मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे  जास्त मंत्रीपद आणि महत्वाचे खाती घेण्यासाठी यादी सोपवली आहे अशीही माहिती समोर येत आहे.

एनडीए आमदारांची  बैठक आज रविवार १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये नितीश कुमार यांची एनडीएचा NDA नेता म्हणून निवड केली जाईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार निवडणुकीत भाजपा ७४ जागा जिंकून एनडीएत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आतापर्यंत सत्तेची सुत्रधार राहिलेल्या जदयूकडे यंदा ४३ जागा आल्या आहेत. तर, असा देखील अंदाज लावला जात आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडून अतिमागासवर्गातून एखादे नाव पुढे केले जाऊ शकते. तसेच, याबाबत अद्याप काही निश्चित झालेले नाही.

हेही वाचा l Bigg Boss 14 l ‘जान सानूने मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

सुशील मोदींच्या जागेवर कोणाला आणले जाईल. उत्तर प्रदेशप्रमाणे दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्मुला देखील अवलंबला जाऊ शकतो. भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आरएसएसशी निगडीत नेते कामेश्वर चौपाल यांच्या नावाची चर्चा आहे. चौपाल हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात.मात्र आज काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here