नितीश कुमारांना धक्का, शिक्षणमंत्र्यांचा 72 तासांमध्ये राजीनामा

नितीश कुमार सरकार विरोधकांच्या दबावामुळे झुकले, तीन दिवसात मोठा झटका

bihar-education-minister-mewa-lal-choudhary-resigns-nda-jdu
bihar-education-minister-mewa-lal-choudhary-resigns-nda-jdu

पटना l नितीश कुमार सरकारला Bihar मोठा धक्का बसला आहे. भष्ट्राचार प्रकरणात आरोपी मेवालाल चौधरी Mewalal choudhary यांनी तीन दिवसांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज (गुरुवार 19 नोव्हेंबर ) आपला पदभार हाती घेतला होता. मात्र, अवघ्या काही तासातच मेवालाल चौधरी यांना शिक्षणमंत्री Education Minister पदावरून पायउतार व्हावे लागले.

बिहारमध्ये एनडीएचे NDA सरकार स्थापनेपासूनच  विरोधी पक्ष राजद RJD आणि काँग्रेस Congress ने मेवालाल चौधरी Mewalal choudhary यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेडीयूचे नेते मेवालाल चौधरी यांच्यावर २०१७ साली भागलपूर साबूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदावर असताना भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता.

मेवालाल चौधरी Mewalal choudhary कुलगुरू असताना त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून १६१ सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ शास्त्रज्ञांची नेमणूक केली होती. याशिवाय सबौर कृषी विद्यापीठ परिसरातील इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मेवालाल चौधरी यांच्याविरोधात २०१७ मध्ये चौकशी सुरू केली गेली होती, ज्यामध्ये त्याच्यावरील आरोप योग्य असल्याचे दिसून आले होते. मात्र, चौधरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. गुरुवारी राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना देखील म्हटलं की, हे आरोप खोटे आहेत.

हेही वाचा l धक्कादायक l विजेच्या धक्क्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

तत्पूर्वी, मेवालालाल चौधरी यांनी विरोधकांद्वारे आपल्यावर लादल्या गेलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, दोषारोपपत्र दाखल केले जाते तेव्हाच आरोप सिद्ध होतात किंवा कोर्टाने यावर आदेश देतं. पण आरोप सिद्ध करण्यासाठी यापैकी काहीही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा l Eknath Shinde l नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 56 व्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण

दरम्यान, मेवालाल चौधरी यांनी आज आपल्या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांना फारच कष्ट पडत असल्याचे जाणवले. भष्ट्राचाराच्या आरोपाबाबत त्यांनी आपली बाजू मांडली पण त्यावर उत्तरं देताना ते अडचणीत असल्याचे दिसून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here