Bike tips : आपल्या दुचाकी वाहनाची कशी घ्यावी काळजी? वाचा ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

bike-tips-how-to-keep-your-two-wheeler-in-good-condition-use-these-five-easy-but-useful-tips-news-update-today
bike-tips-how-to-keep-your-two-wheeler-in-good-condition-use-these-five-easy-but-useful-tips-news-update-today

Bike Tips नवीन चारचाकी किंवा दुचाकी घेतली की सुरुवातीला तिची प्रचंड काळजी घेतो. तिला वरचेवर पुसून घेतो, सर्व्हिसिंग करून आणतो. मात्र, कालांतराने या सर्व गोष्टींमध्ये खंड पडू लागतो. अशाने तुमचे वाहन लवकर खराब होण्याची किंवा त्यामध्ये वरचेवर बारीकसारीक त्रास उद्भवण्याची शक्यता असते. तसेच आपण जिथे राहतो तेथील वातावरण, खराब रस्ते, धूळ-माती इत्यादी सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या गाडीवर होत असतो.

खरंतर चारचाकीपेक्षा दुचाकी वाहने ही बघायला गेलो तर अधिक उपयुक्त, चालवण्यास सोपी आणि अगदी कुठेही घेऊन जाता येणारे असे वाहन आहे. इतकेच नाही, तर इंधनाचा खर्चदेखील चारचाकीपेक्षा कमी असून त्यांची काळजी घेणे, मेंटेन करणे अधिक सोईचे असते. तुमची दुचाकी अधिककाळ उत्तम प्रकारे चालू ठेवण्यासाठी या पाच सोप्या, परंतु तितक्याच महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा.

दुचाकीची काळजी कशी घ्यावी?

>>दुचाकीची स्वच्छता

रस्त्यावरील खड्डे, धूळ, माती, लहान लहान दगड, खडे यांसारख्या कितीतरी गोष्टींचा सामना आपली दुचाकी दररोज करत असते. त्यामुळे रस्त्यावरील अशा बारीकसारीक गोष्टी गाडीमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यासाठी दर आठवड्याला गाडी अगदी व्यवस्थित धुणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही सुट्टीच्या दिवशी पाण्याच्या मदतीने घराखाली दुचाकीची स्वच्छता करू शकता. ही टीप प्रत्येकाला माहीत असली तरी खूप महत्त्वाची आहे.

>>इंजिन ऑइल तपासणे

आपल्या गाडीमधील इंजिन ऑइल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी गाड्या अधिक प्रमाणात फिरवल्या जातात; ज्याचा परिणाम थेट त्याच्या इंजिनवर होत असतो. असे असताना, आपल्या गाडीने सुरळीत आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देता चालावे असे तुम्हाला वाटत असल्यास वेळोवेळी इंजिन ऑइलची पातळी तपासून पाहावी. त्यासह गाडीमध्ये कुठे लिकेज नाही ना, हेही पाहावे.

>>टायर्स तपासणे

गाडी व्यवस्थित चालण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे दोन टायर्स. सतत रस्त्यावर धावणाऱ्या टायरमध्ये कधीकधी लहान खडे किंवा दगड घुसून बसतात; जे टायरमधील हवा काढण्याचे काम करतात, गाडी पंक्चर करतात. सध्या बहुतांश गाड्यांमध्ये ट्युब्लेस टायर बसवलेले असतात. त्यामुळे चाक पूर्णपणे हवा जाऊन बसत नाही. परंतु, तुम्हाला गाडी पंक्चर असल्याची शंका असल्यास ताबडतोब मेकॅनिकला दाखवावी. तसेच, वरचेवर हवेचा दाबदेखील तपासून पाहावा.

>>बॅटरी तपासणे

बॅटरी योग्य प्रकारे काम करत नसल्यास कोणतेही वाहन नीट चालणार नाही. त्यामुळे जर तुमची गाडी सुरू होण्यास त्रास देत असेल, मध्येच बंद होत असेल किंवा त्याचे हेडलाईट्स हवा तितका प्रकाश देत नसल्यास मेकॅनिकला गाडी आणि त्यामधील बॅटरी तपासून पाहण्यास सांगावे.

>>नियमित सर्व्हिसिंग करणे

गाडी किती दिवसांनी सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते किंवा किती किलोमीटर प्रवास झाल्यानंतर गाडी सर्व्हिसिंगसाठी आणावी हे वाहन विकत घेताना सांगितले जाते. त्या वेळा न चुकता पाळायला हव्या. तसेच गाडी जुनी झाल्यांनतरही ठराविक कालावधीनंतर मेकॅनिककडे जाऊन एकदा गाडी तपासून, तिची सर्व्हिसिंग करायला हवी. तरच तुमचे वाहन अधिककाळासाठी उत्तम काम करू शकते, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here