भाजपा दिल्ली मुख्यालयात कोरोनाचा विस्फोट, ५० जणांना लागण

bjp-delhi-headquarter-50-workers-covid-19-positive-news-update
bjp-delhi-headquarter-50-workers-covid-19-positive-news-update

मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या (BJP) दिल्ली मुख्यालयातल्या ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली. यामध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासह माध्यम विभागात करणाऱ्या संजय मयुख यांना कोरोना संसर्ग झाला आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात असून सर्व कोरोना नियमांचं पालन करत असल्याची माहिती हाती आली आहे.

यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यालयाचं सॅनिटायझेशन करण्यात आलं असून दररोज आणखी चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामांसाठीच कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आगामी उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक कार्यालयात झाली होती. या बैठकीची दुसरी फेरी आज होणार होती.

ते म्हणाले होते, प्राथमिक लक्षणं दिसू लागल्याने करोनाची चाचणी करून घेतली आहे. माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला आता बरं वाटत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतःला विलग करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापली चाचणी करून घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here