विनायक राऊत मातोश्रीचा नवा थापा; निलेश राणेंचं टीकास्त्र

bjp-former-mp-nilesh-rane-attack-shivsena-mp-vinayak-raut
bjp-former-mp-nilesh-rane-attack-shivsena-mp-vinayak-raut

मुंबई: शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केल्याने निलेश राणे Nilesh-rane संतापले आहेत. विनायक राऊत vinayak-raut यांनी नारायण राणेंचं शिक्षण काढल्याने निलेश राणे यांनी जिथे दिसणार तिथे फटकावणार अशा शब्दांत इशारा दिला आहे.

“इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत विनायक राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

“नेहमीप्रमाणे विनायक राऊत भुंकायला बाहेर आले आहेत. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? भाजपाच्या लाटेत दोन वेळा हा माणूस निवडून आला,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊत यांना आव्हान देताना म्हटलं आहे की, “हिंमत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा, किती मत मिळतात ते पहा. पण ते हिंमत करणार नाही. आपण लाटेत निवडून आल्याचं त्यांना माहिती आहे”.

“खासदारकीचा एकही गुण यांच्यात नाही. सभागृहात तर अब्रूच काढत असतात. धड बोलता येत नाही, विषय माहिती नसतात. मातोश्रीचा चप्पलचोर अशी त्यांची ओळख आहे. हा मातोश्रीचा नवा थापा आहे,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.

“विनायक राऊत तुमची वेळ जवळ आली आहे. २०२४ मध्ये तुमचा बंदोबस्त करणार. तुम्हाला कायमचा कोकणातून हाकलून देणार हे १०० टक्के सांगतो. भाषा बदलली नाही तर जिथे दिसाल तिथे फटकावणार एवढं लक्षात ठेव”.

हेही वाचा:

नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा; म्हणाले, आपलं ‘हे’ व्हॅलेंटाइन गिफ्ट…

Rajiv-kapoor l अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here