भाजपाने देव आणि दैवत व महापुरुषांचा बाजार मांडला, स्वाभिमान, संस्कृती व अस्मितांशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ – सचिन सावंत

देव, दैवत व महापुरुषांच्या अपमानावर फडणवीस, शिंदे व अजित पवारांनी खुलासा करावा, काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी जनता हा अपमान खपवून घेणार नाही.

BJP has presented a market of gods, goddesses and great men, playing with self-respect, culture and identity, playing the game of corporate Hindutva - Sachin Sawant
BJP has presented a market of gods, goddesses and great men, playing with self-respect, culture and identity, playing the game of corporate Hindutva - Sachin Sawant

मुंबई : भारतीय जनता पक्ष (BJP) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) गेली अनेक वर्ष धर्माचाराष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केला आहेअसा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले कीभाजपाचे हिंदुत्व आता कार्पोरेट झाले असून पैशासाठी त्यांनी आपले देवआराध्य दैवत व ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आता कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आता आयसीआयसीआय लोम्बार्डमहालक्ष्मीचे एचडीएफसी लाईफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निप्पॉन एमएफ असे नामकरण केले आहे. आपल्या अस्मितांशी चालवलेला हा खेळ संताप आणणारा आहे. भारतीय जनता पक्षमुख्यमंत्री फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यावर खुलासा करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या नावासमोर कोटक लावलेले चालते काअसा प्रश्न विचारून काँग्रेस पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कदापी सहन करणार नाहीअसा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे.

शेतकरीमजूरकामगारमहिलाबेरोजगारीचे प्रश्न असताना त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा नामकरणाच्या नावाखाली अस्मितेचे राजकारण करत आहे. इलाहाबादचे प्रयागराजफैजाबादचे अयोध्यादिल्लीतील राजपथचे कर्तव्यपथरेसकोर्स रोडचे लोक कल्याण मार्ग नामकरण केले परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुगांधी यांच्या नावाची भाजपाला ऍलर्जी असल्याने सायन्स सेंटरच्या नावातून नेहरु व नॅशनल पार्क स्टेशनच्या नावातून संजय गांधी यांचे नाव मात्र वगळले आहे. ही नावे आपला सार्वजनिक वारसा आहे आणि तोच भाजपाने विकायला काढला आहे. आपल्या अभिमानाचास्वाभिमानाचाश्रद्धेचा व इतिहासाचा व्यापार चालवला आहे. आता काळबादेवी व शितलादेवी स्टेशन बाकी आहेत त्यासाठीही कार्पोरेट कंपन्यांसमोर हे सरकार हात पसरून त्यांच्या नावासाठीही लिलाव करतील. देशातील विमानतळेबंदरे,  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यासरकारी जागा कार्पोरेट्सना विकत आहेत. कार्पोरेटच्या हितासमोर भाजपाने धर्मअस्मिता व संस्कृतीवर पाणी सोडले आहे. सनातन धर्माच्या नावाने शंख फुंकणारे देवस्थानांची नावे विकत आहेत यातून भाजपाचे दांभिक हिंदुत्व दिसून येते. सत्तेसाठी अस्मितेचे राजकारण करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र तीच अस्मिता कार्पोरेट्सच्या पायी वाहतोअसेही सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here