विधान परिषद पोटनिवडणूक l भाजपाच्या अमरिश पटेलांची काँग्रेसवर मात

महाविकास आघाडीला झटका, राष्ट्रवादीची होती नाराजी

bjp-leader-amrish-patel-wins-dhule-nandurbar-local-body-elections-vidhan-parishad-bypolls
bjp-leader-amrish-patel-wins-dhule-nandurbar-local-body-elections-vidhan-parishad-bypolls

धुळे l विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. भाजपाचे अमरिश पटेल Amrish patel ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील Abhijeet patil यांना केवळ ९८ मते मिळाली. त्यामुळे भाजपाचा येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला.

१ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मात दिल्याचे स्पष्ट झाले. धुळे-नंदुरबार

अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते.

महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे.

कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही चित्र दिसत आहे.

महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही. त्यामुळे या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात आलेले उमेदवार होते. तर अभिजीत पाटील भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते.

हेही वाचा l HDFC Bank l एचडीएफसी बँकेला झटका, नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवले

या निवडणुकीत खूपच ‘ड्रामा’ होता. अखेर गुरूवारी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झालं. भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या फरकाने विजयी झाले.

 • धुळे जिल्ह्यातील एकूण मतदार
  धुळे जिल्हा परिषद – 60
  धुळे महानगरपालिका – 77
  दोंडाईचा नगरपालिका – 28
  शिरपूर नगरपालिका –  34
  साक्री नगरपंचायत – 19
  शिंदखेडा नगरपंचायत – 19
  एकूण – 237 
 • नंदुरबार जिल्हातील एकूण मतदार
  नंदुरबार जिल्हा परिषद – 62
  नंदुरबार नगरपालिका – 44
  नवापूर नगरपालिका – 23
  शहादा नगरपालिका – 31
  तळोदा नगरपालिका – 21
  अक्राणी नगरपंचायत – 19
  एकूण – 200
 •        संख्याबळ
  बीजेपी- 199
  काँग्रेस – 157
  एनसीपी – 36
  शिवसेना – 22
  एमआयएम – 9
  समाजवादी पार्टी – 4
  बहुजन समाज पार्टी – 1
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
  अपक्ष – 10
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here