शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का? भाजपने शिवसेनेला डिवचले

BJP-leader-Upadhye - Sanjay Raut-BMC- election
BJP-leader-Upadhye - Sanjay Raut-BMC- election

मुंबई l आगामी मुंबई महापालिका BMC निवडणुकीवरून शिवसेना भाजपमध्ये Shivsena-Bjp चांगलाच वाद रंगला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक सवाल विचारत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी संजय राऊत Sanjay Raut यांना लक्ष्य केले. 

गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आम्ही त्या 105 आमदारांना घरी बसवले. आगामी निवडणुकीत शिवसेनेचेही एवढे आमदार निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन केशव उपाध्ये यांनी राऊत यांनी लक्ष्य केले.

हेही वाचा l नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?;शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना सवाल

संजय राऊत हे शिवसेना अजिंक्य असल्याचा दावा करतात. आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. ज्या मित्रपक्षाच्या मदतीने तुम्ही निवडणूक जिंकलात त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

पण शिवसेनेला महाविकासआघाडीत तेवढ्या जागा तरी मिळतील का?

आता शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आणण्याच्या गप्पा मारत आहे. मात्र, पुढच्या निवडणुकीत 105 आमदार निवडून यायचं सोडा पण शिवसेनेला महाविकासआघाडीत तेवढ्या जागा तरी मिळतील का?

असा सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला. महाविकासआघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिले.

संजय राऊत म्हणाले ‘मुंबई आपलं नाक आहे, महापालिका जिंकायची’

मुंबई हे आपलं नाक आहे. इतकी वर्षे मुंबईत शिवसेनेची ताकद राहिली आहे. त्यामुळे आता आपले प्राधान्य मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेगळ्याच साच्यात घडवले आहे.

आता तो साचा कुठे मिळणार नाही. त्यामुळे देशात शिवसेना ही अजिंक्य आहे. त्यामुळे आपण 105 आमदारांना घरी बसवले ना. पुढल्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

हेही वाचा : ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक माजी खासदार मोहन रावले गेले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here