‘हम दो हमारे पाच’चा संकल्प करा, मुलांना हत्यारं विकत घेऊन चालवायला शिकवा

भाजप नेते विनीत अग्रवाल शारदा यांचं आवाहन

bjp-leader- vineet agarwal sharada-gave-unique-slogan-on-republic-day-said-we-two-our-five-ask-people-to-take-resolve-
bjp-leader- vineet agarwal sharada-gave-unique-slogan-on-republic-day-said-we-two-our-five-ask-people-to-take-resolve-

मेरठ: उत्तर प्रदेशमधील UP मेरठ Meerut येथे भाजपाच्या नेत्याने जनतेला हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. भाजपाच्या व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा vineet agarwal sharada यांनी हे भाषण केलं. इतकचं नाही त्यांनी मुलांना हत्यारं विकत घेणं आणि ती चालवणंही शिकवलं पाहिजे असंही आपल्या भाषणात म्हटलं.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये झेंडावंदनानंतर विनीत अग्रवाल शारदा बोलत होते. जोपर्यंत कुटुंब नियोजनासंदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण हम दो हमारे पाचचा संकल्प केला पाहिजे. तसेच आपण जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम तयार होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दोचा सिद्धांत संपवला पाहिजे असा युक्तीवादही शारदा यांनी केला.

यावेळेस शारदा यांनी सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा, असं म्हटलं आहे. शारदा यांनी या पाच मुलांना काय काम देण्यात यावं यासंदर्भातही आपल्या भाषणामध्ये भाष्य केलं.

या पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावं. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणं आणि ते चालवणं शिकवावं. एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावं आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावं, असं शारदा यांनी म्हटलं आहे.

आज लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र दिवस असून आजच्याच दिवशी सरकारने सर्वांसाठी हम दो हमारे दोचा नियम बनवावा किंवा आजपासून आपण सर्वांनी हम दो हमारे पाचचा संकल्प अंमलात आणावा, असंही शारद आपल्या भाषणात म्हणाले.

आपल्या भाषणामध्ये शारद यांनी रामायणाचाही संदर्भ दिला. महाराज दशरथ यांना चार पुत्र होते. दशरथ यांना चार पुत्र नसते तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात हम दो हमारे पाचची गरज आहे. असं झालं नाही तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल.

हेही वाचा: Tractor Rally Violence: किसान नेताओं ने दिल्ली हिंसा के पीछे दीप सिद्धू और केंद्रीय एजेंसियों का हाथ बताया

भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारत मातेला प्रमाण करताना मी हम दो हमारे पाचचं समर्थन करतो, असंही शारद यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. यापूर्वीही शारदा हे त्यांच्या कमल कमल कमलच्या वक्तव्यासाठी सोशल मिडियावर चर्चेत आले होते हे विशेष.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here