Sharad Pawar l शरद पवारांच हे सोयीचं राजकारण;नारायण राणेंचा हल्लाबोल

Bjp-minister-narayan-rane-made-a-false-claim-before-the-media-called-shah-during-the-questioning-says-mumbai-police-news-update-today
Bjp-minister-narayan-rane-made-a-false-claim-before-the-media-called-shah-during-the-questioning-says-mumbai-police-news-update-today

मुंबई l राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल्यानंतर राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवारांनी काँग्रेसची तुलना नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासोबत केल्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीदेखील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून हे सोयीचं राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नाही अशा शब्दांत टीका केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसनं आता स्वीकारावं की ते आता जमीनदार राहिलेले नाहीत, असं म्हटलं.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी!

“काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे,” असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.

काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला ;नाना पटोलेंचा शरद पवारांवर पलटवार!

नारायण राणेंची टीका 

“शरद पवार कधी काय बोलतील….एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचं. हा प्रकार काय आदर्श राजकारणी म्हणणार नाही. हे सोयीचं राजकारण आहे,” अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

फडणवीसांचा टोला 

“काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसला खोचक टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here