सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

bjp-leader-ashish-shelar-angry-over-mahavikas-aghadi
bjp-leader-ashish-shelar-angry-over-mahavikas-aghadi

मुंबई l शिवसेना भाजपमध्ये Shivsena-Bjp आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले.  अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या मुद्द्यावरूनच भाजपाचे आमदार आशिष शेलार Ashish shelar यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

“२ लाख ५० हजार नवे रोजगार आणि ६१ हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा… आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार?”, अशाप्रकारे आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, “सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!”, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला.

हेही वाचा : वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्कसह या गोष्टी होणार सुरु

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे हे सर्व सामंजस्य करार करण्यात आले. ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या वेळी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते. करोनाचे संकट असतानाही राज्याच्या उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. घरातून ताकद मिळल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या परिवारातील आहात. 

तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. महाराष्ट्र नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. ‘उद्योगमित्र’ ही संकल्पना उत्तम असून, त्यातून उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : SSC, HSC supplementary exam result 2020 l दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here