नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा; म्हणाले, आपलं ‘हे’ व्हॅलेंटाइन गिफ्ट…

पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक

Is there no threat of taking action against MLA Nitesh Rane in Maharashtra Police? : Atul Londhe
Is there no threat of taking action against MLA Nitesh Rane in Maharashtra Police? : Atul Londhe

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे Nitesh-rane यांनी व्हॅलेंटाइन डे valentine-day निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Cm-Uddhav-thackeray यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचं जुनं प्रेम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे आपलं व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच सिंधुदूर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, “मीदेखील बातमी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात.

वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे”.

“मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सहीसाठी फोन केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर त्यांनी सही केली.

आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 

Rajiv-kapoor l अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here