”मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री…”; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

bjp-mla-nitesh-rane-targets-chief-minister-uddhav-thackeray-minister-aditya-thackeray
bjp-mla-nitesh-rane-targets-chief-minister-uddhav-thackeray-minister-aditya-thackeray

मुंबई: मुख्यंत्री स्वतः कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आटापीटा करत असताना, दुसरीकडे वरळीचे आमदार व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील क्लब व पबमधील काही व्हिडिओ रविवारी व्हायरल झाले. ज्यामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. या व्हिडीओमध्ये कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावरून भाजपा आमदार नितेश राणे Nitesh-rane यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav-thackeray यांना टोला लगावला आहे.

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे!” असं नितेश राणे यांनी ट्वटि केलं आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

वरळीच्या लोकांचं म्हणणं त्यांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींच पूर्णपणे ऐकतात. त्यामुळेच कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला नाईट लाइफ पहायला मिळत आहे, असं फडणवीस आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता म्हणाले होते.

हेही वाचा: कंगनाला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी

तसेच पुढे बोलताना, “११ ची मर्यादा त्या ठिकाणी नाही. रात्रभर तिथे क्लब, पब तिथे सुरु आहेत. कोणतंही सोशल डिस्टन्सिंग तिथे पाळलं जात नाही. सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असतं ते नाईट लाईफसाठी थोडी आहे? त्या करता आदेश मिळालेत की नाईट लाईफ चाललंच पाहिजे,” असं देखील उपरोधात्मकपणे फडणवीस यांनी बोलून दाखवलं होतं.

हेही वाचा: इंधन दरवाढ करून जनतेला लुटणारे, भाजपचे लुटारु सरकार; नाना पटोलेंची घणाघाती टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here