GDP घसरतोय, ही सुद्धा ‘देवाची करणी’ का?; सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर

निर्मला सितारामन यांच्या वक्त्यवावरुन लगावला टोला

Bjp mp subramanian-swamy-slams-central-government-and-nirmala -sitharaman-over-act-of-god-issue
Bjp mp subramanian-swamy-slams-central-government-and-nirmala -sitharaman-over-act-of-god-issue

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केला त्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याबरोबर केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. ट्विटवरुन यासंदर्भात व्यक्त होताना स्वामी यांनी कोरोनापूर्वी अर्थव्यवस्थेला जी घरघर लागली ती पण देवाचीच करणी होती का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. भरपाईपोटी राज्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे दोन पर्याय केंद्राने दिले.

 “मला समजलंय की अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बैठकीमध्ये करोना १९ ही देवाची करणी असल्याचं म्हटलं. मी याबद्दल व्हिडिओ पोस्ट करेनच. मात्र २०१५ च्या आर्थिक वर्षात ८ टक्क्यावर असणारा जीडीपीमध्ये झालेली वार्षिक घट आणि आज (२०२० च्या पहिल्या तिमाहीमध्ये) तो ३.१ पर्यंत खाली येणं ही सुद्धा देवाची करणी आहे का?”, असा थेट सवाल स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना म्हणजे देवाची करणी

पाच महिन्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले असून त्यांनी केंद्राकडे जीएसटीच्या नुकसानभरपाईसाठी सर्व राज्य मागणी करत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची १.५ लाख कोटींची नुकसानभरपाई केंद्राने दिलेली नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सलग पाच तास जीएसटी परिषदेत चर्चा झाली. या बैठकीमध्ये सीतारामन यांनी देशावर आलेले करोना संकट हे  ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हटलं.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here