लखीमपूरमध्ये हिंदू विरुद्ध शिख वाद तयार करण्याचा प्रयत्न, भाजप खासदाराचा गंभीर आरोप

Bjp-mp-varun-gandhi-say-attempt-to-turn-lakhimpur-kheri-into-a-hindu-vs-sikh-battle-news-update
Bjp-mp-varun-gandhi-say-attempt-to-turn-lakhimpur-kheri-into-a-hindu-vs-sikh-battle-news-update

नवी दिल्ली: भाजपाचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी लखीमपूर हिंसाचारावरुन (lakhimpur kheri violence) पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. लखीमपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडल्यानंतर तेथे हिंदू (Hindu) विरुद्ध शिख (Sikh) असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वरुण गांधी यांनी केलाय. त्यामुळे हा उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला घरचा आहेर असल्याचं मानलं जातंय. वरुण गांधी यांनी एक ट्विट करत आपली भूमिका मांडली. यात त्यांनी क्षुद्र राजकीय फायद्याला राष्ट्रीय एकतेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, असा सल्लाही दिलाय.

वरुण गांधी म्हणाले, “लखीमपूरमधील घटनेला हिंदू विरुद्ध शिख अशा वादात रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे केवळ अनैतिक आणि चुकीचं नसून ही विभागणी धोकादायक आहे. ज्या जखमा भरायला अनेक पीढ्या लागल्या त्या पुन्हा करणं धोकादायक आहे. आपण क्षुद्र राजकीय फायद्याला राष्ट्रीय एकतेपेक्षा अधिक महत्त्व द्यायला नको.

वरुण गांधी यांनी वेळोवेळी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय. याआधी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची महिंद्रा थार गाडी शेतकऱ्यांना चिरडतानाचा व्हिडीओ देखील ट्विट केला होता.

हेही वाचा 

सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा!

नवाब मलिकांनी नीतेश राणेंना दिला सावध राहण्याचा सल्ला, म्हणाले…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here