भोपाळ l मध्यप्रदेशात भाजपाकडून Madhyapradesh-Bjp पुन्हा काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर पोट निवडणुका होत आहेत. सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.
कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहलेले आमदार उमंग सिंघार यांनी भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश Madhyapradesh-Bjp करण्यासाठी मंत्रीपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्य स्फोट सिंघार यांनी केला आहे.
उमंग सिंघार माननीय विधायक व पूर्व मंत्री जी ने सिंधिया जी द्वारा उन्हें मंत्री पद व ₹५० करोड़ का ऑफ़र देने का गंभीर आरोप लगाया है। यदि सही नहीं है तो सिंधिया जी को इसका खंडन करना चाहिए।
— digvijaya singh (@digvijaya_28) October 31, 2020
सिंघार यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष करत टीका केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सिंघार यांच्या आरोपांना उत्तर द्यावं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले.
उमंग सिंघार हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे खास होते. यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी उमग सिंघार सत्य बोलतं आहेत की खोटं हे स्पष्ट करायला हवं, असं बदनावरमधील सभेत दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. दिग्विजय सिंह यांनी ट्विट कर शिंदे यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केलं आहे.





















































































































































































