तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलोय; नारायण राणेंचा हल्लाबोल

Bjp-minister-narayan-rane-made-a-false-claim-before-the-media-called-shah-during-the-questioning-says-mumbai-police-news-update-today
Bjp-minister-narayan-rane-made-a-false-claim-before-the-media-called-shah-during-the-questioning-says-mumbai-police-news-update-today

मुंबई l मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी आज हायकोर्टाने 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. त्यानंतर नारायण राणे Narayan Rane यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

‘तुम्ही कुणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही”, असं टीकास्त्रही त्यांनी सोडले.

दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले –

‘दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचे राज्य आहे, हे दिसून येते. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आले आहे. जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिले. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला सुरुवात करा. १९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही. असेही नारायण राणे यांनी सांगितले. भाजपा माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला त्यासाठी नड्डा साहेब, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वांचे मला पाठबळ मिळाले मी त्यांचा आभारी आहे. असंही त्यांनी सांगितले.

‘मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो. असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे. असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही. असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला. हा योगी आहे की, ढोंगी चपल्लांनी मारले पाहीजे. पवार साहेब, मुख्यमंत्री केलंत त्यांचा सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला बोलतात चप्पलाने मारला पाहीजे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही नारायण राणे यांनी निषाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here