कंगनाच्या कार्यालयावर मनपाचा हातोडा

bmc-taken-action-on-kangana-office-juhu
bmc-taken-action-on-kangana-office-juhu

मुंबई : कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने बुलडोझर फिरवले. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या.

त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here