Jagdish Lad l कांस्यपद विजेता बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनामुळे निधन

body-builder-jagdish-lad-dies-due-to-corona-news-update
body-builder-jagdish-lad-dies-due-to-corona-news-update

मुंबई: मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता.तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती.body-builder-jagdish-lad-dies-due-to-corona-news-update

जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

हेही वाचा : …त्या अपराधाबद्दल कुणाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा;शिवसेनेचा सवाल

कोरोनाची लागण झाल्यानंत जगदीश लाड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचं निधन झालं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here