Sanjay Raut: संजय राऊत तुरुंगातून बाहेर,जेलबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष!

bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today
bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today

मुंबई: शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. तब्बल १०२ दिवसानंतर संजय राऊत बुधवारी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास तुरुंगातून बाहेर आले. कार्यकर्त्यांनी आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर त्यांचे जंगी स्वागत केले. राऊत तुरुंगाबाहेर येताच त्यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून आनंद व्यक्त केला. जेलबाहेर आतषबाजी करण्यात आली. यावेळी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी झाली होती. 

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या या जामिनाला विरोध करत ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.संजय राऊत यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) न्यायालयात विरोध केला होता. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यानंतर ईडीला मोठा धक्का बसला आहे.

राऊतांच्या जामीनानंतर मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. राऊतांच्या स्वागताचे मोेठे फलक लावण्यात आले. कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच तुरुंगाबाहेर,तसेच राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांच्या सुटकेचे स्वागत केले तसेच पुढील लढाईसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पक्षातील बुलंद तोफ पुन्हा कडाडणार हे नक्की आहे. त्यामुळे सत्ताधा-यांचा कशा प्रकारे समाचार घेतात याकडे सत्ताधारी,विरोधकांचे लक्ष लागलेले आहे. 

उध्दव ठाकरेंकडून राऊत कुटुंबियांना फोन…

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राऊत कुटुंबियांना फोन करुन आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here