Buldhana Shivsena :बुलढाण्यात शिवसेना व शिंदे गटात राडा, शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना धक्काबुक्की

S

buldhana-shiv-sena-and-shinde-factions-raged-news update today
buldhana-shiv-sena-and-shinde-factions-raged-news update today

बुलढाणा : बुलढाण्यात (Buldana) शिवसेना (ShivSena) विरुद्ध शिंदे गटात (Shinde Group) जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.

विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही (Buldana Lathi Charge) करावा लागला.

मोठा तणाव यावेळी निर्माण झाला होता. शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरेंनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते अशा दोघांमध्ये यावेळी घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. हा राडा नियंत्रणात आणताना पोलिसांना अखेर आपली सगळी शक्ती पणाला लावाली लागली होती. यादरम्यान एकच गोंधळ निर्माण झाला होता.

काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना त्या कार्यक्रमात घुसल्याचं सांगितलं जातंय. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

पोलिसांसमोरच हा राडा झाला. यावेळी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला. ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला आणि पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा राडा शांत करण्याचा प्रयत्न केला.

बुलडाण्यात हायव्होल्टेज ड्रामा!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अख्ख्या बुलडाण्यातील आमदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्या बुलडाण्यात करण्यात आल्या होत्या. या नव्या नियुक्त्यांना आव्हान देण्यासाठी हा राडा करण्यात आल्याचं दिसून आलं. नुकतीत बुलडाण्याचे शिवसेना खासदार आणि आमदार, तसंत शिंदे गटाला समर्थन दिलेले सगळे जण एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट घेण्यासाठी बुलडाण्यातील सर्वजण मुंबईत आलेले होते. या भेटीला अवघे काही दिवसच उलटलेत. त्यानंतर आज बुलडण्यात तुफान राडा झाल्याचं दिसून आलंय.

नरेंद्र खेडेकरांसह या नेत्यांना झाली धक्काबुक्की…

शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यासंदर्भात अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा: MHT CET 2022 Answer Key : महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट आंसर-की के लिए ऑब्जेक्शन की लास्ट डेट रविवार तक, यहां देखें समय 

Lenovo ThinkPad X1 Fold : लेनोवो ने लॉन्च किया फोल्डिंग लैपटॉप, कीमत 1,98,600 रुपये से शुरू, 1TB का Gen 4 SSD स्टोरेज 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here