Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरे म्हणाले…

eknath-shinde-tests-covid-positive-Aaditya thackeray-gave-imp-suggestion
eknath-shinde-tests-covid-positive-Aaditya thackeray-gave-imp-suggestion

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath-shinde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे  यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी  एकनाथ शिंदे यांना पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा. असा सल्ला दिला.

sआदित्य ठाकरे ट्विटवर म्हणाले

“एकनाथ शिंदेजी काळजी घ्या, गेले सहा महिने कोरोनाविरोधातला लढा आपण देखील फ्रंटलाइनवरुनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल याची मला खात्री आहेच. पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा.”

 एकनाथ शिंदे म्हणाले,संपर्कात आलेल्यांनो योग्य काळजी घ्या

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here