गौतम नवलखांचा जामिन अर्ज फेटाळला; शहरी नक्षलवादाच्या आरोपाचे प्रकरण!

शहरी नक्षलवादप्रकरणी सध्या नवी मुंबई येथील घरी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची नियमित जामिनाची मागणी विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

case-of-charges-of-urban-naxalism-gautam-navlakha-bail-plea-was-rejected-by-the-special-court-news-update-today
case-of-charges-of-urban-naxalism-gautam-navlakha-bail-plea-was-rejected-by-the-special-court-news-update-today

मुंबई: शहरी नक्षलवादप्रकरणी सध्या नवी मुंबई येथील घरी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा (Gaoutam Navlakha) यांची नियमित जामिनाची मागणी विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय ‘गोपनीय’ असल्याची टिप्पणी करून उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात तो रद्द केला होता.

तसेच नवलखा यांचा जामीन अर्ज नव्याने ऐकण्याचे आणि त्यावर चार आठवडय़ांत कारणांसह निर्णय देण्याचे आदेशही विशेष न्यायालयाला दिले होते. त्यानुसार, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी नवलखा यांच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेतली. तसेच गुरुवारी त्यावर निर्णय देताना नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here