ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता केंद्र सरकारने यूकेतून भारतात होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. 22 डिसेंबर रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे.
ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन (कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट) असल्याचे समोर आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यापेक्षा 70% अधिक संसर्ग पसरवणारा असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनमुळे भारतातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.
एका सर्व्हेक्षणात 50% लोकांनी व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे पीडित देशांमधून विमानांची आवकजावक बंद करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये मिळालेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेनमुळे घाबरण्याचे काही कारण नाही. सरकार याबाबत सतर्क असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
7 हजार लोकांमध्ये केले सर्व्हेक्षण
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन VUI-202012/01 आढळला आहे. हा अत्यंत सुपरस्प्रेडर असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या फ्लाइट्स बंद केल्या आहेत.
या दहशतीत सोशल मीडिया कम्युनिटी LocalCircles ने सोमवारी दिल्लीत 7091 लोकांमध्ये सर्व्हेक्षण केले. यापैकी 50% लोकांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि कोरोना व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे प्रभावित सर्व देशांमधून भारतात ये-जा करणाऱ्या फ्लाइट्स तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
फ्लाइट्स बंद कराव्यात, विरोधी पक्षाची मागणी
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ब्रिटनमधून ये-जा करणाऱ्या विमानांचे उड्डाण थांबवण्याचे केंद्र सरकारला आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर अनेक सलग पोस्ट्स केल्या.
दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाव्हायरसच्या नव्या स्वरूपाला सुपरस्प्रेडर म्हटले आहे.
व्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते
व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत असते, म्हणजे याचे गुण बदलत असतात. म्यूटेशन होणारे बहुतेक व्हायरस स्वतःच संपतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा अधिक पटीने मजबूत आणि धोकादायक बनतात.
Considering the prevailing situation in the UK, Indian govt has decided that all flights originating from the UK to India shall be temporarily suspended till 11:59 pm, 31st December. This suspension to start w.e.f. 11.59 pm, 22nd December: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/ruSRpspbak
— ANI (@ANI) December 21, 2020
ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की वैज्ञानिकांना एक रूप समजेपर्यंत नवीन रूप समोर येत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी आवश्यक
२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.