छत्रपती शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न : सचिन सावंत

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध, जाहीर माफी मागा.

Chatrpati Shivaji Maharaj bjp narendra modi Chandrakant patil sachin sawant
Chatrpati Shivaji Maharaj bjp narendra modi Chandrakant patil sachin sawant

मुंबई: भारतीय जनता पक्ष (BJP) सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shivaji Maharaj) यांची तुलना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी करुन शिवरायांचा  अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक आहे. भाजपाच्या या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेत सचिन सावंत पुढे म्हणाले की, शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा हिंदवी स्वराज्य, हिंदुत्वाची व्होट बँक याच्याशी संबंध जोडून चंद्रकात पाटील यांनी ‘तारे’ तोडले आहेत. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कधीच आदर नव्हता. छत्रपतींचे राज्य हे भाजपा आरएसएसचे कधीच आदर्श नव्हते त्यांचा आदर्श पेशावाईच होता आणि आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व विजय गोयल यांनीही यापूर्वी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केली होती. ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक भाजपानेच प्रकाशित केले आहे ते पुस्तक अजून मागे घेतलेले नाही व त्यावर कारवाईही केलेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे असून त्याबद्दल महाराष्ट्राची जनता यांना कदापी माफ करणार नाही. भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, असेही सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here