औरंगाबादच्या रांजणगांवात चार शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू!

दोन भावंडांसह चौघांचा मृत्यू, रांजनगांवावर शोककळा

Aurangabad-chhatrapati-sambhaji-nagar -news-marathi-four-minor-children-drown-near-waluj-area-chhatrapati-sambhaji-nagar-maharashtra-news-update-today
Aurangabad-chhatrapati-sambhaji-nagar -news-marathi-four-minor-children-drown-near-waluj-area-chhatrapati-sambhaji-nagar-maharashtra-news-update-today

औरंगाबाद: रांजनगाव येथील पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.रांजनगावातील दत्तनगर मधील सख्खे भाऊ अफरोज जावेद शेख (१४), अबरार जावेद शेख (१२), सोबत मित्र विश्वजीत कुमार सुखदेव उपाध्यय (१२) आणि कुणाल अनिल दळवी (१४) अशी मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत. थंडीच्या कडाक्यात पोहण्यासाठी तलावात गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हद्रयद्रावक घटना रांजनगांवातील बनकरवाडी तलावात घडली. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चारही मुलांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून   पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. ही काळीज पिळवणारी घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. रांजनगावातील दत्तनगरावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडले होते. रांजनगावातील बनकरवाडी तलावात चौघे पोहोण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे पाण्यात बुडाले.  चौघे अचानक बेपत्ता झाल्याने मुलांच्या नातेवाइकांनी शोध सुरु केला असता चौघांचे कपडे तलावाजवळ आढळुन आले. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली मुले पाण्यात बुडाली असावीत असे वाटल्याने त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दल तसेच पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे पी के चौधरी, के. टी. सूर्यवंशी, एन एस कुमावत, पी. के. हजारे, एस. बी. महाले, वाय. दि. काळे, एस. बी. शेंडगे आदींच्या पथकाने चारही मुलांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी प्रभाकर महालकर, दीपक बडे, दत्तू हिवाळे, जावेद शेख आदी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी देखील मदत केली. पोलिसांनी चौघांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी चौघांना तपासुन मृत घोषित केले.

शिवसेनेचे जावेद शेख यांच्यावर डोंगर कोसळला…

रांजनगावातील शिवसेनेचे विभागप्रमुख तथा आझाद मित्र मंडळाचे शेख जावेद यांना दोन मुले होती. अफरोज आणि अबरार हे दोघे सख्खे भाऊ बुडून मृत्यू पावल्याने शेख कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला. अफरोज शेख हा मदरशात शिक्षण घेतो तर लहान मुलगा अबरार हा साईराम इंग्रजी शाळेत शिक्षण घेतो. एकाच गल्लीतील चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झालयाचा घटनेने रांजनगावातील दत्तनगरात शोककळा पसरली आहे.

महिण्याभरातील दुसरी घटना…

बजाज नगरातील मोकळ्या मैदानाजवळील एका धार्मिक स्थळाशेजारी असलेल्या खड्यातील पाण्यात बुडून चैताली महेश देशमुख आणि त्याचा भाऊ समर्थ महेश देशमुख या दोघांना बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती.हि घटना ताजी असताना पुन्हा राजनगावातील चार मुलांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झालयाची घटना उघडकीस आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here