chhatrapati sambhaji nagar : ‘’छत्रपती संभाजीनगर महापालिका’’ ठराव रात्री दोन वाजता मंजूर!

"Chhatrapati Sambhajinagar Municipality" resolution approved at 2 pm!

मुंबई: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji maharaj) आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास केंद्र सरकारने २४ फेब्रुवारी मंजुरी दिली आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेने छत्रपती संभाजीनगर महापालिका करण्याचा ठराव रविवारी मध्यरात्री २ वाजता महापालिका प्रशासकांनी मंजूर केला. तो ठराव नगर विकास विभागाला पाठवण्यात आला. अशी माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबादच्या नामकरण प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर शहरात शुक्रवारी विविध राजकीय पक्ष संघटनांनी जल्लोष साजरा केला. मात्र, शहरात जी-२० च्या कार्यक्रमांची रेलचेल सुरु असल्यामुळे महापालिकेचे अधिकारी कार्यक्रमांमुळे व्यस्त आहेत. अखेर मनपा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी मध्यरात्री औरंगाबाद महापालिकेचे छत्रपती संभाजीनगर महापालिका असे ठराव मंजूर केले. हा प्रस्ताव राज्यशासनाच्या नगर विकास विभागाला पाठवला. यावेळी मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह इतर तीन अधिकारी उपस्थित होते.

असा आहे नामांतराचा ३४ वर्षांचा प्रवास…

>>१९८८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला.

>>१९९५ मध्ये औरंगाबादचे सभाजीनगर हे नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.

>>१९९५ राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली.

>>१९९६ मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

>>१९९९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.

>>२००२ मध्ये मुस्ताक अहेमद यांनी याचिका निकाली निघाली.

>>२०१० मध्ये औरंगाबाद हवे की संभाजीनगर, याच मुद्यावर शिवसेना-भाजप युतीने महापालिका जिंकली.

>>२०१४ युती सत्तेत आल्यानंतर नामकरणाच्या प्रस्तावाला पुन्हा हवा मिळाली, परंतु निर्णय झाला नाही, या सरकारात शिवसेनेने सतत नामांतराची मागणी केली.

>>२०१५ मध्ये हिंदुत्व संभाजीनगर या मुद्यावर निवडणुका झाल्या. मात्र नामकरणाला बगल दिली गेली.

>>४ मार्च २०२० औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून माहिती मागविली.

>>२०२१ मध्ये सुपर सभाजीनगर असा नारा देत शहरात डिस्पले (इल्युमिनेटेड लेटर्स) लावले. तसेच पालकमंत्र्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला, सरकारी दौ-यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड.

>>८ जून २०२२ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धीनंतरच नामकरणाचा विचार जाहीर सभेत व्यक्त केला.

>>२१ जून २०२२ शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राज्य सरकार अल्पमतात येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

>>२९ जून २०२२ तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर,उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.

>>१४ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेला नामांतराचा ठराव रद्द केला.

>>१६ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

>>२४ फेब्रुवारी २०२३ राज्य सरकारने पाठवलेल्या छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here