छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने पोलिस, महसूल, अन्य शासकीय विभागातील कार्यालयातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलिस अधिका-यांना तीन वर्ष व त्यापेक्षा अधिकचा कालावधी एका ठिकाणी झालेला असेल त्यांची बदली दुस-या जिल्ह्यात बदली करावी असे आयोगाचे निर्देश आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलात (Chhatrapati Sambhaji Nagar Police) सर्व नियम धाब्यावर बसवून पाच वर्षापेक्षा जास्त कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहर पोलिस दलात मर्जीतील अधिका-यांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुध्दा त्यांची बदली करण्यात आली नाही. त्या अधिका-यांना कुणाचा आशीर्वाद आहे याची कुजबूज सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, संभाजी पवार, ब्रम्हा गिरी, जनार्दन साळुंके या अधिका-यांचा कार्यकाळ चार वर्षापेक्षा जास्त झाला आहे. तरी सुध्दा या अधिका-यांची बदल झाली नाही. या अधिका-यांवर एवढी मेहरनजर कुणीची? अशीही चर्चा शहर पोलिस दलात सुरु आहे. मर्जीतल्या अधिका-यांसाठी व इतर अधिका-यांसाठी नियम वेगळे का अशीही चर्चा जोरात सुरु आहे.
बॉक्स…
आयोगाने घेतली दखल तरीही…
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पोलिस दलात अधिका-यांच्या बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश धाब्यावर बसविण्यात आले. त्याची दखल महाराष्ट्र प्रशासनिक लवाद (मॅट) आणि आयोगानेही घेतली आहे. आयोगाने याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मागविला आहे हे विशेष.