शिवरायांच्या महाराष्ट्राची, मुंबईची बदनामी खपवून घेणार नाही; राऊतांचा इशारा

कंगना राणौतने स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावं असा दिला सल्ला

sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news
sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची, मुंबईची बदनामी सहन करणार नाही, अथा थेट इशारा संजय राऊत  यांनी पुन्हा एकदा दिला आहे. त्याचवेळी कंगना राणौतने स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावं, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

भाजपने कंगनाशी असहमती दाखवली तरीही

राऊत म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी कोणी अशी करत असेल तर हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. भाजपने कंगनाशी असहमती दाखवली असली तरी त्यांनी खोलात जाऊन ही भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.

कंगनानं स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे

कंगनानं स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे, असा सल्ला त्यांनी दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला योग्य ते सुनावले आहे. राज्य सरकार तिच्याबद्दल काय तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here