Uddhav Thackeray l मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

corona-is-hitting-the-head-once-again-in-the-state-cm-uddhav-thackeray
corona-is-hitting-the-head-once-again-in-the-state-cm-uddhav-thackeray

मुंबई l मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्राशी बोलणार आहेत. याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच लोकल,शाळा,मंदिरं,अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान यासह कांजुरमार्ग मेट्रो कारशेड या विषयांवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा l Arnab Goswami l अर्णब गोस्वामींचा मुक्काम तळोजा कारागृहात

दिवाळी बिहार निवडणुकीचे एग्झिट पोल्स, अर्णब गोस्वामींची अटक या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काही बोलतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.  

महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेने वारंवार केला आहे. त्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा l FASTag jan 2021 l सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. करोनानंतरचं शालेय जीवन कसं असू शकतं त्याबाबतही मुख्यमंत्री बोलू शकतात असाही अंदाज आहे.

राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध उपक्रमांचं लोकार्पण करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here